वृत्त क्र. 92
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत
बोधडी येथे हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव कार्यक्रम
नांदेड (जिमाका) दि. 31 :-
प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने 30 जानेवारी 2024 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय व किनवट तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय, बोधडी बु. यांच्या संयुक्त विद्यमाने बोधडी बु. येथे हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी उपस्थित गावकरी, महिला व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना रस्ता सुरक्षा विषयक माहिती पुस्तिका व पॉम्प्लेटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास बोधडी गावचे सरपंच बालाजी भिसे, उपसरपंच, ग्रामसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी व सुमारे 150 ते 200 नागरिकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वितेसाठी मोटार वाहन निरीक्षक गणेश तपकीरे, सहायक मोटार वाहन निरिक्षक केशव जावळे यांनी परिश्रम घेतले.
0000
No comments:
Post a Comment