Monday, January 29, 2024

 वृत्त क्र.  86 

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित

दिव्यांग विद्यार्थ्याच्या आज जिल्हास्तरीय क्रीडा तर उद्या सांस्कृतिक स्पर्धा

 

नांदेड (जिमाका)दि. 29 :- जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने मंगळवार 30 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. वजिराबाद येथील पोलीस परेड ग्राउंड येथे दिव्यांग विद्यार्थ्याच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा तर बुधवार 31 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता आयटीएम येथील कुसुमताई सभागृहात सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

 

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊतद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेपोलीस उपअधीक्षक कीर्तिकाजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजितकौर जजजि..चे उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावारसमाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार व समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे आदींची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवारप्रभारी वैसाका कुलदीप कलुरकर यांच्या मार्गदर्शनात विविध समित्यांचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

0000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...