पात्र नागरिकांनी उपलब्ध नोंदीच्या आधारे
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन
नांदेड, (जिमाका) दि. 25:- जिल्हयातील विविध विभागातील, कार्यालयातील 1967 पूर्वीच्या जुन्या अभिलेखांची तपासणी करुन त्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी शोधण्याची कार्यवाही चालू आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र नागरीकांनी उपलब्ध नोंदी आधारे कुणबी,मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.
तपासणीअंती आढळून आलेल्या नोंदींचा अहवाल समितीस वेळीवेळी सादर केला आहे. आढळून आलेल्या सर्व नोंदी जिल्हा संकेतस्थळावर अपलोड करुन सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. महसूल विभाग, भूमी अभिलेख, शिक्षण विभाग, सह जिल्हा निबंधक इत्यादींसह विविध शासकीय कार्यालय/ विभागातील जुन्या अभिलेखांची तपासणी करुन कुणबी नोंदींचा शोध घेण्यात आला आहे. आजपर्यत 25 लाख 90 हजार 168 इतक्या नोंदींची तपासणी करण्यात आली असून त्यात 1 हजार 748 एवढया कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यापैकी 1 हजार 222 नोंदी मोडी लिपीतील असल्याने त्यांचे लिप्यंतर, तर 25 नोंदी उर्दू भाषेतील असल्याने त्यांचे भाषांतर करून सर्व 1 हजार 748 नोंदींचे स्कॅनिंग करुन जिल्हा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
या कुणबी जात नोंदी सर्वसामान्य नागरीकांना सहज उपलब्ध होण्यासाठी आढळून आलेल्या नोंदींची यादी संबंधीत ग्रामपंचायत कार्यालय तसेच तलाठी कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरीकांना जात प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी 17 व 18 जानेवारी रोजी विशेष मोहिम राबवून प्रमाणपत्र मिळवणे बाबत जागृती करण्यात आली आहे. नोंदी तपासणीची आणि आढळून आलेल्या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही निरंतर चालू आहे. आजपर्यंत 579 पात्र अर्जदारांना कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
नागरीकांनी प्रथमत: त्यांचेशी संबंधीत नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://nanded.
00000
No comments:
Post a Comment