जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील
मुख्य रोडवर प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड (जिमाका) दि. 22 :- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे मान्यवरांचे हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी व उपाय प्रशासनाच्या वतीने केले गेले आहेत.
मंगळवार 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 29 जानेवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुढील प्रतिबंध आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयापासून, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा, चिखलवाडी कॉर्नर, महावीर चौका पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर 29 जानेवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे , रॅली, रास्ता रोको, आंदोलन इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध केले आहेत.
0000
No comments:
Post a Comment