रब्बी हंगामासाठी पाणी पाळयाचे वेळापत्रक जाहीर
· फेब्रुवारीपर्यंत चार प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाण्याची आवर्तने
नांदेड (जिमाका) दि. 6 :- रब्बी हंगामाकडे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना उर्ध्व पेनगंगा प्रकल्प, निम्न मानार प्रकल्प, शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प आणि पूर्णा पाटबंधारे विभागाद्वारे फेब्रुवारी 2024 पर्यत पाण्याची आवर्तने जाहीर करुन नांदेड पाटबंधारे मंडळाने मोठा दिलासा दिला आहे. या नियोजनानुसार सन 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी सिंचन आवर्तन पाणीपाळयाचे नियोजन जाहीर केले आहे.
रब्बी हंगाम 2023-24 साठी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर धरणातील) उपलब्ध पाणीसाठयानुसार एकूण 4 पाणीपाळया (आर्वतन) देण्याचे निश्चित केले आहे. पहिले आर्वतन उजव्या व डाव्या कालव्यातून 5 ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सोडण्यात येणार आहे. दुसरे आर्वतन 5 ते 25 डिसेंबर 2023 या कालावधीत तर तीसरे आर्वतन 5 जानेवारी ते 25 जानेवारी 2024 आणि चौथे आर्वतन 5 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सोडण्यात येणार आहे. या सर्व आवर्तनाचा कालावधी 20 दिवसांचा राहील.
निम्न मानार प्रकल्प ता. कंधार साठी एकूण 3 आवर्तन डावा व उजवा कालव्यासाठी सोडण्यात येणार आहेत. पहिले आर्वतन 25 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत तर दुसरे आर्वतन 30 डिसेंबर 2023 ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत तर तीसरे आर्वतन 29 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सोडण्यात येणार आहे. पहिले आर्वतन 20 दिवसांसाठी तर दुसरे व तीसरे आवर्तन अनुक्रम 15 दिवसांसाठी राहील.
रब्बी हंगामात प्रथम पाणीपाळी मध्ये प्रथमत: सिंचनासाठी मा.गो.शा.का.क्र.1 व 2 साठी 12 दिवस चालू राहील. मानार डावा कालवा 8 दिवस चालू राहील. अशी एकूण 20 दिवसाची पहिली पाणी पाळी राहील. दुसऱ्या व तिसऱ्या पाणीपाळी मध्ये प्रथमत: सिंचनासाठी मा. गो.शा.का.क्रं.1 व 2 साठी 9 दिवस चालू राहील. मानार डावा कालवा 6 दिवस अशी एकूण 15 दिवसाची दुसरी व तीसरी पाणीपाळी राहील.
शंकररावजी चव्हाण विष्णुपरी प्रकल्पासाठी एकूण 2 आर्वतन कार्यक्रम प्रस्तावित आहेत. 10 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2023 या 25 दिवसात पहिले आर्वतन तर दुसरे आर्वतन 15 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 31 दिवसांच्या कालावधीत सोडण्यात येईल.
पूर्णा पाटबंधारे विभाग वसमतनगर या प्रकल्पाअंतर्गत एकूण 2 आर्वतन प्रस्तावित आहेत. पहिले आर्वतन 20 डिसेंबर 2023 ते 16 जानेवारी 2024 पर्यत सोडण्यात येणार असून दुसरे आवर्तन 20 जानेवारी 2024 पासून 16 फेब्रुवारी 2024 पर्यत सोडण्यात येईल. दोन्ही आवर्तनाचा कालावधी 28 दिवसांचा आहे. प्रत्येक पाणी पाळी मध्ये प्रथमत: सिंचनासाठी वसमत शाखा व हट्टा शाखा कालवा रब्बी हंगामात 14 दिवस लासिना शाखा कालवा व अंतिम शाखा कालवा रब्बी हंगामात 14 दिवस असे एकूण रब्बी हंगामात पाणी पाळी 28 दिवसाची राहील. नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत या चारही प्रकल्पावरील रब्बी सिंचन कार्यक्रमातर्गत पाऊस किंवा आकस्मिक घटनामुळे आवर्तनाच्या दिनांकात बदल होवू शकतो. या निश्चित कालावधीनुसार प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या कालवाधारक शेतकऱ्यांनी यांची नोंद घ्यावी, असे नांदेड पाटबंधारे मंडळावतीने कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment