वृत्त
ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीच्या
मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंध आदेश
नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यातील जानेवारी ते
डिसेंबर 2023 या कालावधीत
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने
स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्याने निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या
सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतदानाच्या
दिवशी मतदान केंद्र परिसरात रविवार 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान
संपेपर्यन्त तर मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात सोमवार 6 नोव्हेंबर
रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता
1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत
केले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच ग्रामपंचायतीमधील रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2023 व ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2023 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी रविवार 5 नोव्हेंबर रोजी ज्याठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून तसेच सोमवार 6 नोव्हेंबर 2023 रोजी ज्याठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्याकरीता या आदेशाद्वारे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे.
ग्रामपंचायत पोटनिवडणूक
मुखेड तालुक्यातील डोंगरगांव, सलगरा खु, जांब खु, पिंपळकुठा. देगलूर तालुक्यातील भक्तापुर. बिलोली तालुक्यातील बावलगाव. लोहा तालुक्यात कापसी खु, धानोरा म. उमरी तालुक्यात हस्सा, इज्जतगांव आमदापुर. कंधार तालुक्यात बामणी प क, बोरी (खु), मंगलसांगवी. अर्धापुर तालुक्यात दाभड, लोणी खु. माहूर तालुक्यात भोरड, वसरामतांडा, गोकुळ गोंडेगाव, टाकळी. भोकर तालुक्यात गारगोटवाडी दि.,चिदगिरी, पांगरपहाड, पांधरा, बेल्लोरी धा, लोणी या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक
निवडणूक
नांदेड तालुक्यातील नागापूर. मुदखेड तालुक्यातील वाई, हदगाव
तालुक्यातील गवतवाडी, तळ्याचीवाडी, लोहा / लोहा तांडा. किनवट तालुक्यातील भुलजा, पिंपळगांव (की), कोठारी
(ची), खंबाळा, दरसांगवी (ची), परसराम नाईकतांडा. माहूर तालुक्यात चोरड (जुनापाणी). धर्माबाद तालुक्यात हसनाळी. नायगांव
खै. तालुक्यात लालवंडी. मुखेड तालुक्यात
कर्णा. लोहा तालुक्यात देवला
तांडा. देगलूर तालुक्यात गोगला गोविंद
तांडा, अंबुलगा व मरतोळी या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
00000
No comments:
Post a Comment