Friday, October 6, 2023

 महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता 5  8 वी साठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ    

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व जानेवारी/फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी अंतिम मुदतवाढ प्रवेश अर्ज 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा  तपशील पुढील प्रमाणे आहे.  विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी शनिवार 7 ऑक्टोबर ते रविवार 15 ऑक्टोबर 2023 रोजीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर सोमवार 9 ऑक्टोबर ते बुधवार 18 ऑक्टोबर 2023 या कालावधीत विद्यार्थ्यांना  मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे  अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. सोमवार 23 ऑक्टोंबर 2023 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावाअर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.   

000000 

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...