आपत्ती धोके निवारण्यास कटिबद्ध होण्यासाठी
प्रत्येक कार्यालयात 13 ऑक्टोबर रोजी घेतली जाईल प्रतिज्ञा
नांदेड, (जिमाका) दि. 12 :- संयुक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी व लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती निवारण दिवस म्हणुन जाहीर केला आहे. जगभर हा दिवस आपत्ती धोके निवारणासंबंधी जनजागृती करुन व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवुन साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातही शासनातर्फे दरवर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये 13 ऑक्टोबर हा दिवस ‘आपत्ती धोके निवारण दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
सर्व जिल्ह्यामध्ये याबाबत अधिक जागरूकतेसाठी रंगीत तालीम घेण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी नागरिकांना आपत्ती प्रतिसादासाठी कटिबध्द होण्यासंदर्भात सन 2023 यावर्षी प्रतिज्ञा तयार केली आहे. सदर प्रतिज्ञा 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. जिल्ह्यातील सर्व कार्यालयात घेण्यात यावी, असे जिल्हाप्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment