Monday, September 25, 2023

 महास्वयंम पोर्टलच्या सेवा सुविधाचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 25 :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महास्वयंम www.mahaswayam.gov.in  पोर्टलच्या लाभार्थी घटकासाठी विविध ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या ऑनलाईन सेवा घेताना लाभार्थी घटकांना येणाऱ्या अडचणी/तक्रारींचे निराकरण मुख्यमंत्री हेल्पलाईन अंतर्गत 18 ऑगस्ट 2023 पासून हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईनची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यत असून जिल्ह्यातील उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

या ऑनलाईन सुविधामध्ये स्टेक होल्डर्स जसे उमेदवार, उद्योजक, नियोक्ते इ. या संकेतस्थळावर नोंदणी करणे, नोंदणीचे अद्यावतीकरण करणे, रिक्तपदे अधिसूचित करणे, रिक्त पदास अनुसरुन अप्लाय करणे, राज्यातील युवक-युवती, विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना करियरविषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात इच्छूकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इ. विविध ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.  

0000

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...