Wednesday, August 23, 2023

राज्यातील उत्कृष्ट तीन गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषि

राज्यातील उत्कृष्ट तीन गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक · प्रथम क्रमांकासाठी 5 लाख, द्वितीय 2 लाख 50 हजार व तृतीयसाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस · गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत नांदेड (जिमाका) दि. 22 :- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यात 19 सप्टेंबर 2023 पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळाचा शासनाकडून पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. यात प्रथम क्रमांक येणाऱ्या विजेत्यास 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक येणाऱ्या विजेत्यास 2 लाख 50 हजार रुपये तर तृतीय क्रमांक येणाऱ्या विजेत्यास 1 लाख रुपये पारितोषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येणार आहे. राज्य समितीकडे 36 जिल्ह्यातील 1 याप्रमाणे 36 प्राप्त शिफारसीत गणेशोत्सव मंडळापैकी 3 विजेते गणेशोत्सव मंडळ वगळून उर्वरित 33 गणेशोत्सव मंडळाचाही राज्य शासनाकडून 25 हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्या गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यासाठी शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय समिती गठीत करणेबाबत निर्देश आहेत. गणेशोत्सवास विजेत्या मंडळाची निवड करण्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गठीत केली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष उपजिल्हाधिकारी सामान्य, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड हे तर कला महर्षी त्रिंबक वसेकर, चित्रकला महाविद्यालय, नांदेड येथील प्राचार्य, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस उपअधिक्षक गृह हे सदस्य आहेत. तर जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव असतील. या समितीत नियुक्त अधिकारी/पदाधिकारी यांनी शासन निर्णयातील निकषाप्रमाणे 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील विजेत्या गणेशोत्सव मंडळाची निवड करुन गुणांकन व शिफारसीसह अहवाल राज्यस्तरीय समितीला सादर करावा व त्याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. या समितीतील नियुक्त अधिकारी यांनी 19 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रजा/बदली किंवा अन्य कारणामुळे अनुपस्थित असल्यास त्यांचे पदावर संबंधीत विभाग/कार्यालयातील नियुक्त अधिकारी यांनी समितीचे पुढील कामकाज करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहे. 000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...