पीएम किसान योजनेच्या वंचित शेतकऱ्यांसाठी
7 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 8 :- पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत वितरीत होणार आहे. या लाभापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी 7 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास संबंधित तलाठी / तहलिसदार / तालुका कृषि अधिकारी व बॅक शाखा यांच्याशी संपर्क करून थांबलेला लाभ सुरू करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
या मोहिमेत सातबारा, 8 अ व फेरफार असा भूमी अभिलेख तपशील खात्याशी न जोडल्यामुळे लाभ थांबलेले सूरू करणे. ज्या शेतकऱ्यांनी स्वतः ऑनलाईन नवीन नोंदणी केली आहे त्यांचा लाभ सुरू करणे. ज्या लाभार्थ्यांचे बॅकेला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक जोडले नाहीत ते जोडून लाभ सुरळीत सुरू करणे. तसेच लाभार्थ्यांचा आधार क्रमांक पीएम किसान पोर्टल खात्याशी जोडून ई-केवायसी करणे इ. बाबींची पूर्तता केली जाणार आहे.
जिल्हयातील 62 हजार 667 लाभार्थी यांची सातबारा, 8अ व फेरफार असा भूमी अभिलेख तपशील, आधार क्रमांक न जोडल्यामुळे तसेच ई-केवायसी न केल्यामुळे लाभार्थी अद्याप लाभापासून वंचीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या लाभार्थ्यांची भूमि अभिलेख नोंदीप्रमाणे माहिती (सातबारा, ८अ व फेरफार तपशील) भरलेली नाही, त्यांनी संबंधित तलाठी कार्यालय / तहसिल कार्यालय येथे आवश्यक माहिती (सातबारा, 8 अ व फेरफार इ.) द्यावी. लाभार्थ्यांनी स्वतः ऑनलाईन नवीन नोंदणी केली आहे, त्यांनी पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रासह (सातबारा, 8अ व फेरफार, आधार क्रमांक, बॅंक तपशील) इ. माहिती संबंधित तहसिलदार कार्यालय येथे जमा करून लाभ सुरू करून घ्यावा.
यापुढे पी. एम. किसान योजनेचा लाभ सुरळीत सुरू राहण्यासाठी बॅंक खात्यास आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक जोडून डिबीटी ॲक्टीव्ह करणे करणे व ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी पोर्टलवरील फार्मर कॉर्नर पर्यायावर जाऊन मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वतः ई-केवायसी करू शकतात. तसे शक्य नसल्यास जवळच्या सामायिक सुविधा केंद्रावर (सीएससी केंद्रावर) जाऊन स्वतःच्या आधार व मोबाईल क्रमांकाचा वापर करून ई-केवायसी करता येईल. केंद्र शासनाने गुगल प्ले स्टोअरवर पीएम किसान जीओआय PMKISAN Gol या ॲप चा वापर करून शेतकऱ्यांचे पीएम किसान फेस ऑथेटिंकेशन द्वारे ई-केवायसी प्रमाणिकरण करण्याची सुविधा आहे.
00000
No comments:
Post a Comment