Monday, June 26, 2023

 सामाजिक न्याय दिनानिमित्त

समता दिंडी व व्याख्यान कार्यक्रम संपन्न

 

नांदेडदि. 26 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजाच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या समता दिंडीचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी विकास माने यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.

समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप करण्यात आला. या समता दिंडीत नांदेड जिल्हयातील विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्तेअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

त्यानंतर सकाळी  11. वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरसांस्कृतिक सभागृह, सामाजिक न्यायभवन येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षीत असलेली सामाजिक समता आणि वर्तमान याविषयावर प्रा.डॉ.स्वातीकाटे-तौर यांनी मार्गदर्शन केले. यात सामाजिक न्यायाची सुरुवात खऱ्या अर्थाने आपल्या स्वत:पासून केली पाहीजे. आपण ज्या पदावर आहोत त्या पदाला न्याय देता आला पाहीजे असे मत व्यक्त करुनराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विविध विचार पैलु व कार्यावर सखोल मार्गदर्शन प्रा. तौर यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षीत सामाजिक न्यायसमता बंधुता अधिक सक्षम होण्यासाठी सर्वांनी जोमाने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त बापू दासरी तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कार्यालय अधिक्षक अशोक पंडीत हे होते. यावेळी अधिक्षक राजेश सुरकूटलावारवरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती माधवी राठोड, समातादुत प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजाता पाहेरे व महात्मा फुले महामंडळाचे व्यवस्थापक मोहीते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ताहरी कदम यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले. आभार प्रदर्शन समतादूत विनोद पांचगे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

00000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...