खते, बियाणे व किटकनाशके खरेदी व विक्री करताना येणाऱ्या
अडचणीचे निराकरणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना
नांदेड (जिमाका) दि. 26 :- खरीप हंगाम 2023 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकाबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते, किटकनाशके विक्रेत्यांना क्षेत्रिय स्तरावर वेगवेगळया अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खते, बियाणे व किटकनाशके खरेदी व विक्री करताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांना सकाळी 10 ते सायं. 7 या वेळेत संपर्क साधता येणार आहे. शेतकऱ्यांनी काही तक्रारी असल्यास, स्वप्नील अमृतवार, ( मो.नं.9970630379 ), एस.एन चंद्रवशी ( मो.नं 9673033085 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अल्प असल्याने शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. बियाणे खते, किटकनाशके यांचे उत्पादन, वाहतुक, वितरण आणि विक्री करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत खते, बियाणे व किटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी तसेच बियाणे गुणवत्ता संदर्भात तक्रारी करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment