Wednesday, February 22, 2023

वृत्त क्रमांक 79

 जिल्‍हास्‍तरीय कृषि महोत्‍सवाचे

1 ते 5 मार्च या कालावधीत आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त व आंतरराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्‍य वर्ष 2023 चे औचित्‍य साधून कृषि विभाग व आत्‍मा यांच्या संयुक्‍त विद्यमाने नांदेड जिल्‍हा कृषि महोत्‍सवाचे’’ आयोजन 1 ते 5 मार्च 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे. या महोत्‍सवास नागरिकांनी भेट देऊन जास्तीत जास्त शेतमाल खरेदी करुन  शेतकऱ्यांना प्रोत्‍साहन द्यावेअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

 

हा महोत्सवाचे आयोजन सकाळी 10 ते सायं. 8 वाजेपर्यंत कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीनवा मोंढानांदेड येथे करण्‍यात येणार आहे. या कृषि महोत्‍सवात कृषि प्रदर्शनकृषि विज्ञान केंद्र / कृषि विद्यापीठाचे स्‍टॉलविविध कृषि निगडीत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व कृषिसंलग्‍न शासकीय विभागाचे स्‍टॉल असे एकुण 200 स्‍टॉल उभारण्‍यात येणार आहेत. त्‍याचबरोबर विविध विषयांचे चर्चासत्रखरेदी विक्री संमेलनाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. आंतरराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्‍य वर्ष 2023 म्‍हणून साजरे करण्‍यात येणार आहे. पौष्टिक तृणधान्‍यामध्‍ये ज्‍वारीबाजरीनाचणीवरईराळाराजगिरा यासारख्‍या पिकांचा समावेश आहे. पिकाचे आहारामध्‍ये महत्‍व कळावे यासाठी चर्चासत्र पाककृती स्‍पर्धा आयोजित करण्‍यात येणार आहे. याचबरोबर याचा आहारामध्‍ये समावेश व्‍हावा यासाठी त्यापासुन तयार होणारे विविध पदार्थांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.

 

यामध्‍ये जिल्‍हयातील शेतकरी गटशेतकरी उत्‍पादक कंपनी व महिला गटांचा सक्रिया सहभाग या महोत्‍सवात राहणार आहे. महोत्‍सवांच्‍या ठिकाणी आपल्‍या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल गहु,  ज्वारी, तांदूळ, तुर, मुग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले, विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने (गुळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी) तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने जसे, मध, गुळाचा पाक व महिला बचतगटांची उत्पादने (चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी) टरबुज, खरबुज इत्यादी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. तसेच सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍याफळभाज्‍या व फुलभाज्‍या व रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेले लाकडी घाण्‍याचे करडईभुईमुगजवसतीळाचे तेलबांबुपासुन तयार करण्‍यात आलेले वस्‍तु केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. डिंकबिब्याची गोडंबी आदी कच्‍चा माल व काळा गहू उपलब्‍ध राहणार आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...