Tuesday, January 24, 2023

वृत्त क्रमांक 38

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विद्यापीठात

विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी  हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. मतदारांना विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, मतदानाच्या कर्तव्याची जाणीव व्हावी व मतदान प्रक्रियेतील आपल्या मताचे पावित्र्य मतदारांपर्यंत पोहचावेत या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाणार आहे.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष कार्यक्रमास कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठातील सिनेट सभागृहात दुपारी 12.30 वा. होणाऱ्या या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...