वृत्त क्रमांक 35
राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन
नांदेड (जिमाका) दि. 22 :- राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्य) प्रशांत दिग्रसकर होते. स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत बॅडमिंटन इनडोअर हॉलमध्ये आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडाप्रेमींनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व ऑल महाराष्ट्र वुश असोसिएशन व नांदेड जिल्हा वुशू असोसिएशन यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन दिनांक 21 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल नांदेड येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, तालुका क्रीडा अधिकारी संजय गाढवे, लातूर उपसंचालक कार्यालयाचे क्रीडा अधिकारी डी. व्ही. गडपल्लेवार, जागतीक पॅराबॅडमिंटन स्पर्धा पदक विजेती खेळाडू लताताई उमरेकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जनार्धन गुपीले, सुरज सोनकांबळे, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी डॉ.राहुल वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम बुडके, उद्योजक अमोल कदम, ऑल नांदेड जिल्हा वुशू असो. सचिव राजेश जांभळे, सहसचिव डॉ. प्रमोद वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्यातील आठ विभागातून 176 मुले, 144 मुली असे एकुण 320 व निवड समिती सदस्य, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक असे एकुण 350 ते 375 उपस्थित झाले आहेत. मुलांच्या खेळाडूंची निवास व्यवस्था गुरुग्रंथ साहिब भवन यात्री निवास गुरुद्वारा परिसर नांदेड येथे तर सर्व खेळाडूंची भोजनाची व मुलींची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे पंच म्हणुन वर्धा येथील प्रणव विटणकर, अभिषेक सोनावणे, निलेश राऊत, मुंबईचे प्रकाश पगारे, दिनेश् माळी, ठाणेचे साहिल भंडारी, कोल्हापूरचे शारुख अत्तार, अविनाश पाटील, औरंगाबादचे सदाम सय्यद, बंटी राठोड, जोहर अली, कृष्णा चव्हाण, नाशिकचे उमेश थोरे, नागपूरचे प्रफुल्ल गजबिये, गोंदियाचे संजय नागपुरे, निशाराणी पांडे, सोलापूरचे फुलचंद जावळे, माधव शेरीकर, नांदेडचे डॉ. प्रमोद वाघमारे, अक्षय जांभळे, प्रतीक्षा भगत, वाघमारे संदेश, अहमदनगरचे प्रविण थोरात आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार
यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी कलीमओददीन फारुखी, संजय गाडवे,
प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल,
वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, राजेश जांभळे, सचिव, नांदेड जिल्हा वुशू असो. डॉ.
प्रमोद वाघमारे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, क्रीडा शिक्षक रवींद्र
देशपांडे, एन. आर. पोटफोडे, सहशिक्षक जी. आर. कदम, हनमंत नरवाडे, उत्तम कांबळे,
सुभाष धोंगडे, मोहन पवार, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ,
ज्ञानेश्वर रोठे व ऑल नांदेड जिल्हा वुशू असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदि
परिश्रम घेत आहेत.
0000
No comments:
Post a Comment