औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक
कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण संपन्न
नांदेड, (जिमाका) दि. 2 :- निवडणूक आचारसंहितेबाबत भारतीय निवडणूक आयोगाने स्वयंस्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घेतली पाहिजे. यासंदर्भात दिरंगाई, इतर कारणे लक्षात घेतली जाणार नाहीत, असे निर्देश, जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
05-औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यपद्धतीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे प्रशिक्षण आज आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपरजिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संतोषी देवकूळे, तहसिलदार ज्योती चव्हाण व निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व तालुक्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या अडचणी व प्रश्नांचे निराकरण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी योग्यरितीने झाली पाहिजे यासाठी आपण शासन, प्रशासन म्हणून काम केले पाहिजे असे अपरजिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगितले.
औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक
अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीत तीन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकामध्ये फ्लाईग
स्कॉड टीम (FST), व्हिडीओ सरव्हायलन्स
टीम (VST), व्हीडीओ व्हिवींग टीम (VVT) याचा समावेश आहे. ही पथके भारत निवडणूक
आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आली आहेत. या पथकात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर
आचारसंहितेचे उल्लंघन व आचारसंहितेबाबत तक्रार प्रकरणांची चौकशी, मतदारास लाच देणे,
धमकी देणे, गैरवाजवी दडपण टाकणे, समाजकंटकाच्या हालचालीवर लक्ष ठेवणे, शस्त्र बाळगणे,
मतदारांना लाच देण्यासाठी मद्य व पैशाचा वापर करणे यासंदर्भात
प्राप्त तक्रारीची चौकशी करणे, निवडणूक संदर्भात होणाऱ्या
खर्चाबाबत प्राप्त तक्रारींची चौकशी करणे आदी जबाबदारी आहे. प्रत्येक महत्वाच्या घटनांचा तपशिल पाहून
निरीक्षणे नोंदविणे तसेच सीडीत आढळलेल्या बाबींचा अहवाल त्यादिवशी सादर करण्याबाबतचे
प्रशिक्षण व सादरीकरण निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोषी देवकूळे यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment