वृत्त
क्रमांक 13
अपघातापासून
सुरक्षिततेसाठी “उजवीकडून चाला”
अभियानाचा 6 जानेवारीला शुभारंभ
नांदेड, (जिमाका) दि. 5 :- रस्त्यावरील अपघातात पादचाऱ्यांचे वाढणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन यावर उपाययोजनेसाठी आजवर अनेक उपक्रम राबविले. पूर्वीच्या प्रघातानुसार आपण डाव्या बाजुनेच रस्त्यावर चालल्यामुळे पाठीमागुन येणाऱ्या वाहनांची कल्पना न आल्याने गेलेले बळी अधिक आहेत. हे लक्षात घेऊन रस्त्यावर चालतांना समोरून येणारी वाहने आपल्याला दिसावीत व त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यादृष्टीने नांदेड जिल्ह्यात “उजव्या बाजुने चाला” ही अभिनव मोहिम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे.
या अभिनव मोहिमेचा शुभारंभ 6 जानेवारी 2023 रोजी सकाळी
9 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती
शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलामंदीर, एसपी ऑफीस चौक,
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर विद्यार्थी व
मान्यवर उजव्या बाजुने चालून या अभियानाची सुरूवात करतील. याचबरोबर जिल्हाधिकारी
कार्यालय ते वजिराबाद पोलीस स्टेशन, महावीर चौक, वजिराबाद रोड, एसपी ऑफीस चौक,
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरही विद्यार्थ्यांचा
दुसरा गट उजव्या बाजुने चालून लोकांपर्यंत हा संदेश पोहचवतील. या उपक्रमात
सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले
आहे.
0000
No comments:
Post a Comment