Wednesday, January 4, 2023

वृत्त क्रमांक 11

 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

साजरा करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने दिनांक 14 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” म्हणून साजरा करण्याबाबत सर्व कार्यालयांना निर्देशित केले आहे. या निर्देशानुसार कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज शंभर टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये / सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. या पंधरवडयात केलेल्या कार्यक्रमांचे अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.   

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा! • चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्...