Friday, December 2, 2022

 समता पर्व अंतर्गत 16 तालुक्यात

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 26 नोव्हेंबर ते      महापरिनिर्वाण दिन  6 डिसेंबर 2022 या कालावधीत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. समता पर्व निमित्त आज समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील 16 तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांना भेटी देवून समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. 

या भेटी दरम्यान तळागाळातील लोकांना समाज कल्याण विभागाच्या योजनाची माहिती होण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांना भेटून मिनी ट्रॅक्टर योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान  योजना, विशेष घटक योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, रमाई आवास घरकुल योजना, मुला-मुलीसाठी शासकीय वसतिगृह व निवासी शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे या योजनांची माहिती दिली. तसेच यावेळी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनाबाबत  माहिती व घडीपत्रिका देवून प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली. एल..डी व्हॉनद्वारे प्रत्येक तालुक्यात योजनाची प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली आहे.

00000






No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...