Wednesday, November 16, 2022

19  20 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन

ग्रंथ प्रदर्शन-विक्री, परिसंवाद, चर्चासत्रवत्कृत्व स्पर्धाकविता  कथेचे अभिवाचन

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  उच्च  तंत्र शिक्षण विभागग्रंथालय संचालनालय .रा.मुंबई  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या विद्यमाने नांदेड ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहेजिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बहुउद्देशिय सांस्कृतिक संकुलश्री गुरु गोबिंदसिंगजी स्टेडीयम परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी शनिवार 19  रविवार 20 नोव्हेंबर 2022 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन  ग्रंथविक्री असा या ग्रंथोत्सवाचा उददेश असून प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि ग्रंथप्रेमी वाचकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. नांदेडसह महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या प्रकाशकाची दालने याठिकाणी असणार आहेत. औरंगाबाद येथील शासकीय ग्रंथागाराचे  बालभारतीचे विशेष दालन या ग्रंथप्रदर्शनात हणार आहे. या दालनात शासकीय प्रकाशने  दुर्मिळ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

शनिवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता महात्मा ज्योतिबा फुले पुतळा आय.टी.आय चौक येथू कार्यक्रम स्थळापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या  दिंडीमध्ये विविध लोककला सादरीकरण लेझीम पथक, भजनीमंडळ यासह विदयार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या ग्रंथदिंडीस सौ.श्यामल पत्की, संजीव कुलकर्णीरविचंद्र हडसनकर  प्रा.लक्ष्मण कोतापल्ले,  डॉ.अनंत राऊतआनंद कल्याणकरविजय बेंबडे यांची उपस्थिती राहणार आहे.  पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार आहेकार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाटय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दत्ता भगत हे असतील.

 

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाणखासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण , विधान परिषद सदस्य विक्रम काळेविधान परिषद सदस्य अमर राजूरकर, विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकरजिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा घुगे-ठाकूर, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहानेजिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड. गंगाधर पटनेदत्तात्रय क्षीरसागर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांची उपस्थिती असणार आहे.

 

शनिवार 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 4  यावेळेत "वाचन संस्कृती संवर्धनार्थ उपाययोजना"या विषयावर ॲड. गंगाधर पटने यांच्या अध्यक्षेतखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ.जगदीश कुलकर्णीरणजीत धर्मापुरीकर,डॉ. कैलास वडजे, सौ. दीपा बियाणीडॉ.शारदा कदम यांचा सहभाग असणार आहे. सायं 4 ते 6 कविता आणि कथा अभिवाचनमध्ये शांता शेळकेवसंत बापट  कवी शंकर रमाणी यांच्या कविता  अण्णाभाऊ साठे जी..कुलकर्णी यांच्या कथेचे अभिवाचनाचा कार्यक्रम केशव सखाराम देशमुख यांच्या अध्यक्षेतखाली होणार आहे. यामध्ये डॉ.जगदीश कदम, सौआशा पैठणेशिवा कांबळेप्रा.महेश मोरेप्रा.स्वाती कान्हेगावकर हे सहभागी असणार आहेत.

 

रविवार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत "मराठवाडा मुक्ती संग्रामातील संवेदनांचे काठ"या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे. या परिसंवाद मध्ये प्रमुख वक्ते म्हणु प्रा.डॉ.पृथ्वीराज तौर  प्रा.डॉमहेश जोशी, प्रतीक्षा तालंगकर सहभाग नोंदवणार आहेत. दुपारी 2 ते 4 वाजता "आजची समाज माध्यमे  वाचन संस्कृतीया विषयावर माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी वत्कृत्व स्पर्धचे नीलकंठ पाचंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सायं 4 ते 6 यावेळेत नांदेड ग्रंथोत्सवाचा समारोप  बक्षिस वितरणाचा कार्यक्रम धर्मादाय उपायुक्त किशोर मसने यांच्या अध्यतेखाली संपन्न होणार आहे. या कार्याक्रमास प्रमुख अतिथी म्हण प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकरसाहित्यिक देवीदास फुलारीबी.जी.देशमुख, एम.जी.एम कॉलेजचे ग्रंथपाल डॉ.गोंविद हंबर्डे उपस्थित राहणार आहेतया दोन दिवसीय ग्रंथोत्सवास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीने  केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...