धान खरेदीसाठी 15 ऑक्टोंबर पर्यत
ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 7 :- आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये बिलोली (कासराळी) धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर पर्यत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
धान, भरडधान्य नोंदणीसाठी ज्या शेतकऱ्यांचा सातबारा आहे. त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करावयाचा आहे. त्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करिता लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे, असेही जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment