जेष्ठ नागरिकांच्या हक्कांचा प्रसार
या विषयावर कायदेविषयक शिबीर संपन्न
नांदेड, (जिमाका) दि. 19 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षीक सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती डी.एम.जज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या सभागृहात जेष्ठ नागरिक यांच्या हक्कांचा प्रसार करण्याबाबतचे कायदेविषयक शिबीर नुकतेच संपन्न झाले.
या शिबीरासाठी प्रमुख वक्ते
म्हणून जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक तेरकर व रिटेनर लॉयर श्रीमती डोणगावकर हे
उपस्थीत होते. यावेळी
श्रीमती डी.डी.डोणगावकर यांनी जेष्ठ नागरीकांचे हक्क व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या
योजनेबाबत मार्गदर्शन केले. ॲड .व्ही.डी.पाटनुरकर, अॅड एम.झेड. सिद्यीकी यांनी जेष्ठ नागरीकांच्या समस्या मांडल्या.
मुकुंद चौधरी यांनी सामाजीक कार्य करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. अशोक तेरकर
यांनी जेष्ठ नागरीकांबद्दल मनोगत व्यक्त केले. श्रीमती डी.एम.जज यांनी जेष्ठ
नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाचे निराकरण केले. या शिबिरास 20 जेष्ठ नागरीकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार
रिटेनर लॉयर अॅड. नयुमखान पठाण यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment