Wednesday, July 13, 2022

मुदखेड येथे इजळी पुलावर सिता नदीच्या पुरात

अडकलेल्या शर्मा यांना सूखरूप बाहेर काढण्यात यश 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :- मुदखेड तालुक्यातील सिता नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुदखेड जवळील इजळी येथे पुलावर काल दि. 12 जुलै रोजी दोघेजण अडकून पडले होते. बारड येथील सावळा शिंदे आणि रेल्वे कर्मचारी दिपक शर्मा ही अडकून पडलेल्या दोघांची नावे आहेत. ही माहिती मिळताच तात्काळ महसूल यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली. यातील बारडचा सावळा शिंदे स्वत: यातून बाहेर पडला. दिपक शर्मा यांना एसडीआरएफच्या रेस्क्यू टीमने पुरातून सुखरूप बाहेर काढले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, भोकरचे उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र खंदारे, तहसिलदार, पीएसआय सोनटक्के, आदी उपस्थित होते. 

00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...