उद्योजकता विकास अंतर्गत
महिलांसाठी मोफत टेलरिंग प्रशिक्षण
· आरसेडी व उमेदचा उपक्रम
नांदेड, (जिमाका) दि. 3 :- भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी महिला टेलरिंग प्रशिक्षणाचे आयोजन 1 ते 30 जुन 2022 पर्यंत आरसेडी नांदेड येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा प्रशिक्षक गजानन पातेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमेद अभियानाचे राम भलावी, अतिष गायकवाड, कौशल्य समन्वयक प्रियंका चव्हाण, बालाजी गिरी, आशिष राऊत, विश्वास हटृटेकर यांची उपस्थिती होती.
या प्रशिक्षणात नांदेड जिल्ह्यातील 18 ते 40 वयोगटातील महिला सहभागी होऊ शकतात. आतापर्यत 35 महिलांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणात उद्योजकता विकास, कौशल्य विकास अंतर्गत उद्योजकता सक्षमता कार्य दृष्टिकोन, संभाषन, कौशल्य, वेळेचे नियोजन, बँकिंग, प्रकल्प अहवाल, मार्केटिंग सर्व्हे, आर्थिक साक्षरता, इंग्रजी ज्ञान, बेसिक संगणक ज्ञान, शासकीय योजना, सामाजिक सुरक्षा योजना, तसेच शिवणकला अंतर्गत विविध विषयांचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षक ज्योती वांगजे या महिलांना मोफत प्रशिक्षण देवून त्यांना कार्यकुशल करण्याचे काम करीत आहेत. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थ्यांची निवासी आणि जेवणाची मोफत सोय करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रूनिता अर्ध्यापुरकर, अभिजित पाथरीकर, मारोती कांबळे यांनी परीश्रम घेतले.
00000
No comments:
Post a Comment