महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती
अभियानांतर्गत मार्गदर्शन शिबिर संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 21 :- आजादी का अमृत महोत्सव व महाजीवीका अभियानांतर्गत (ऊमेद)अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष नांदेड यांच्या सहकार्याने नवीन उदयोजक / अन्न व्यावसायिक व कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न परवाना, नोंदणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले .
सहायक आयुक्त बी .बी भोसले व प्रकल्प संचालक जि.ग्रा.वी. यां.नांदेड डॉ संजय तुबकले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे यांनी पार पाडले. या मार्गदर्शन शिबिरासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पतेवार, जिल्हा व्यवस्थापक- विपणन धनंजय भिसे , जिल्हा व्यवस्थापक -संस्था बांधणी द्वारकादास राठोड, गणेश कवडेवार,अतिश गायकवाड कौशल्य समन्वयक व जिल्हा व्यवस्थापक माधव भिसे, तालुक्यातील अभियान व्यवस्थापक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0000
No comments:
Post a Comment