Tuesday, June 14, 2022

 



वृक्षारोपणातून नांदेड हरित करण्याचा संकल्प करुयात

 

- मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे

 

§  जिल्ह्यात सुमारे 9 हजार वटवृक्षांची लागवड करण्याचा निर्धार

 

§  वटपौणिमेच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते झाले वटवृक्षाचे वृक्षारोपण

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- भारतीय संस्कृतीतील वटपौर्णिमेला पर्यावरण साक्षरतेचा दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. यादिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पुजा करण्याची परंपरा आहे. यातील पर्यावरणाचा धागा लक्षात घेता प्रत्येकाने आजच्या दिवशी एक तरी वडाचे झाड लावावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मान्यवरांच्या हस्ते वडाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्ताने त्या बोलत होत्या. यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटील, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, सहाय्यक आयुक्त  रेणूका तम्मलवार यांची उपस्थिती होती.  

 


गावात तसेच आपल्या परिसरात वटवृक्षाची लागवड करुन ऑक्सीजन टँक निर्माण करावेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजनचे मुल्य प्रत्येकाने ओळखले असून ऑक्सीजन वृध्दीसाठी व पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन वर्षा ठाकूर घुगे यांनी केले. हरित नांदेडच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे उचलले आहे, असे त्यांनी सांगितले.

 

वटपौर्णिमेनिमित्त आज जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात वडवृक्ष लागवड करण्यात येत. जिल्ह्यात एकाच वेळी सुमारे नऊ हजार वृक्षांची लागवड करण्याची ही मोहीम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमात गावागावात वडांच्या झाडांची लागवड करण्यात येत आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...