जिल्ह्यात आज आढळला एक कोरोना बाधित
नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 44 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. आरटीपीसीआर तपासणीद्वारे निरंक व ॲटीजन तपासणीद्वारे 1 कोरोना बाधित आला आहे. नांदेड ग्रामीण येथे ॲटीजन तपासणीद्वारे 1 कोरोना बाधित आढळला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 801 एवढी झाली असून यातील 1 लाख 108 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 344
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 80 हजार 328
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 801
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 108
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-01
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक
000000
No comments:
Post a Comment