Tuesday, April 12, 2022

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने "रस्ता सुरक्षा मार्गदर्शन" शिबीराचे आयोजन येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नुकतेच करण्यात आले होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. जमदाडेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांची विशेष उपस्थिती होती.

 

यावेळी रस्ता सुरक्षा विषयक नियमवाहन चालवितांना घ्यावयाची काळजीवाहतूक चिन्हहाताचे इशारेहेल्मेट / सिटबेल्ट च्या वापराबाबत सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी मार्गदर्शन केले. रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तींमध्ये दुचाकी स्वारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर केल्यास हे प्रमाण नक्कीच कमी होईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात नो हेल्मेट नो इन्ट्री या अभियानासह वाहतूक नियमांबाबत त्यांनी माहिती दिली.

 

या शिबिरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयशरीर रचना विभाग प्रमुख डॉ. इनामदारप्राध्यापककर्मचारीविद्यार्थी यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी जाधवसहा. मोटार वाहन निरीक्षक केशव जावळे यांनी परिश्रम घेतले.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...