Monday, March 7, 2022

 नांदेड तालुक्यातील आठ गावातील 

गावठाणातील मिळकतीचे नकाशे होणार वितरीत 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- नांदेड तालुक्यातील वानेगाव, पोखर्णी, धनगरवाडी, गाडेगाव, कोर्टतीर्थ, वरखेड, थुगाव, दर्यापूर या गावातील गावठाणातील घराचे ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. या गावठाणातील मिळकतीचे सनदा (नकाशे) तयार झाली आहेत. या सनदा भूमि अभिलेख कार्यालयाकडून 10 ते 12 मार्च 2022 या कालावधीमध्ये त्या-त्या गावात वितरीत करण्यात येणार आहेत. गावातील नागरिकांनी गावात उपस्थित राहून विहित शासकीय शुल्क भरणा करुन ही सनदा (नकाशे) प्राप्त करुन घ्यावीत, असे आवाहन नांदेडचे उपअधिक्षक भूमि अभिलेख यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  738 विकसित महाराष्ट्र 2047 सर्वेक्षणासाठी नागरीकांना सहभाग घेण्याचे आवाहन   नांदेड दि. 17 जुलै :- भारत सरकारच्या विकसित भा...