Thursday, February 10, 2022

विकास प्रक्रीयेत सक्रीय सहभागासाठी

योजनांची माहिती रेल्वेद्वारे लोकांपर्यंत 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जनसामान्याच्या प्रगतीसाठी विविध विकास योजना शासनाने हाती घेतल्या आहेत. यात त्या-त्या घटकांचा सकारात्मक सहभाग व्हावा व त्यांच्यापर्यत या योजना पोहचाव्यात या उद्देशाने विविध योजनांची माहिती रेल्वेद्वारे लोकांपर्यत पोहचवली जात आहेत. मराठवाड्यातील किनवटपर्यत ही माहिती पोहचविण्यासाठी नंदिग्राम एक्सप्रेसची निवड करण्यात आली असून यावर ही योजनाची माहिती दर्शविण्यात आली आहे. दिनांक 8 फेब्रुवारीपासून नंदिग्राम एक्सप्रेसवर ही माहिती प्रदर्शित केली जात आहे. 

मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात महाविकास आघाडी शासनाने विविध विकासात्मक योजना राबविल्या. या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य तर दिलेच शिवाय विविध विकास योजनाही प्रभावीपणे लोकापर्यत पोहचविल्या. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातर्गत आपला महाराष्ट्र आपले सरकार, दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची अंतर्गत शासनाने राबविलेल्या योजनामध्ये समृध्दी महामार्ग, आपदग्रस्तांना दिलासा, उद्योग पर्यटन, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून भरीव तरतूद,  आपदग्रस्ताना मदत वितरीत, कोल्हापूर, सांगली साताऱ्यात एसडीआरएफ व शासनाच्यामाध्यमातून पुरग्रस्तांना सावरण्यासाठी युध्द पातळीवर मदत, विविध तैनात केलेली पथके आपत्तीपासून सुरक्षिततेची हमी, पांढऱ्या सोने अर्थात कापसाच्या विक्रमी खरेदीसाठी मदत, उच्च शिक्षण गोंडवाना विद्यापिठात पदव्युत्तर अभ्यासक्रम, ई-पिक पाहणी, व्यापक लसीकरण, चिंतामुक्त शेतकरी आदी विकास योजनाचा समावेश आहे. रेल्वेच्या माध्यमातूनही विकास योजनाची माहिती मिळत असल्याने प्रवाशानी समाधान व्यक्त केले.

00000








No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...