Monday, January 17, 2022

 लोकशाही बळकट करण्यासाठी

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  जिल्ह्यातील नायगावअर्धापूर व माहूर नगरपंचायतीच्या एकूण 11 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी  9 हजार 832 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेतसर्व मतदारानी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

नगरपंचायत अर्धापूरनायगाव व माहूर या नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता संबंधित तहसिल कार्यालयात होणार आहेमतमोजणीच्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाकडील मार्गदर्शक सूचना व आदेशाचे पालन करण्यासाठी मतमोजणीनंतर राजकीय पक्षांनीलोकप्रतिनिधी व उमेदवार व इतर कोणत्याही व्यक्तींना मिरवणूका रॅली इचे आयोजन करता येणार नाहीतरी सर्व नागरिकांनी कोव्हिड अनुरूप व्यवहार करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...