Saturday, January 1, 2022

वृत्त क्रमांक 1

 शासकीय तंत्रनिकेतनच्यावतीने नगिना घाट परिसरात स्वच्छता अभियान 

नांदेड (जिमाका) दि. 1 :-  नववर्षाच्या निमित्ताने शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांच्यासह विज्ञान विभागाच्या 17 जणांच्या टीमने नगीनाघाट परिसर आज सकाळी स्वच्छ केला. स्वच्छतेचे मंत्र ध्यानी धरा आरोग्य आपले निरोगी करा, स्वच्छता आहे एक महाअभियान चला देऊ या आपल्या सर्वांचे योगदान”  या भावनेतून सामाजिक बांधिलकी सर्वांनी जपण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संस्थेचे प्राचार्य डॉ. गर्जे यांनी केले.

 

दरवर्षीप्रमाणे येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे स्वच्छता पंधरवडा अंतर्गत परिसर स्वच्छ करण्यात येतो. संस्था परिसरात प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांच्या मार्गदर्शनाने मागील तीन आठवड्यापासून परिसर स्वच्छता अभियान सुरू आहे. संस्थेतील सर्व चतुर्थ कर्मचारी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत विज्ञान विभागाने नववर्षारंभाचे औचित्य साधून पहिल्याच दिवशी नगीनाघाट गुरुद्वारा येथे घाटाची स्वच्छता करण्याचे ठरविले. समन्वयक डॉ. अनघा अरविंद जोशी व अजय एन. यादव यांनी  रीतसर गुरुद्वारा व महापालिका यांच्याशी संपर्क साधून स्वच्छता करण्यासाठी परवानगी घेतली.

 

यावेळी महापालिकेच्यावतीने श्री. कंधारे व श्री. लांडगे हे उपस्थित होते. विज्ञान विभागाचे विभाग नियंत्रक प्रा. एस. आर. मुधोळकर त्यांच्यासोबत सर्व प्राध्यापक  पी. के. शेवाळकर, डॉ. ए. ए. जोशी, ए. एन. यादव, ए. बी. दमकोंडवार, व्ही. एम. नागलवार, डॉ. जी. एम. डक, एस. पी.  राठोड, डॉ. डी जी. कोल्हटकर, एस. जी. दुटाळ, एस. एन. नरवाडे, के. एस. कळसकर, डॉ. एस. व्ही. बेट्टीगिरी, एम. एस. भोजने, शेख जावेद, आर. के. देवशी, ए. एस. पावडे व जे. बी. रत्नपारखी यांचा सक्रिय सहभाग होता.

00000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...