नागापूर येथे प्रशासन आपल्या गावी योजनेचा शुभारंभ
-जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 23 :- गावातील लोकांच्या प्रशासकीय पातळीवर असलेल्या विविध समस्या व कामाचे निराकरण गाव पातळीवरच व्हावे या उद्देशाने प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम आज भोकर तालुक्यातील नागापूर येथे संपन्न झाला. ‘गुड गव्हर्नन्स वीक’ अंतर्गत हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासनाशी निगडित असलेल्या कामांबाबत तालुका व जिल्ह्याच्या पातळीवर जाण्याचे काम पडता कामा नये. त्यांचे प्रश्न व समाधान संबंधित विभाग प्रमुखांकडून गावातच व्हावे या दृष्टीने यावर्षी ‘गुड गव्हर्नन्स वीक’ उपक्रमाची संकल्पना प्रशासन आपल्या गावी अशी ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी देवून कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी भोकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसिलदार राजेश लांडगे, गटविकास अधिकारी अमित राठोड व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
महास्वराज्य अभियान
2021-22 अंतर्गत प्रशासन आपल्या गावी हा उपक्रमाचा शुभारंभ झाला. ग्राम स्तरावर
लोकसहभागातून ग्रामस्वच्छता व ग्रामविकासास चालना मिळण्यासाठी स्मार्ट ग्राम हा
उपक्रम प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. भोकर तालुक्यातील विविध कार्यालयाशी
संबंधित कामकाजासाठी मंडळनिहाय उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमात भोकर तालुक्यातील 21 गा
वांची स्मार्ट ग्रामच्या
माध्यमातून चळवळ उभी होत आहे. आज या उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी
शासनाच्या तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख, पुरवठा विभाग, सामाजिक
वनीकरण, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन
विभाग, महिला व बालविकास, ग्रामविकास,
शिक्षण, महसूल, निवडणूक,
विद्युत वितरण कंपनी सहकार आदी विभागाकडून विविध विषयासंदर्भातील
माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. यावेळी कोविड लसीकरण, आरोग्य
तपासणी, जनावरांचे लसीकरण आदी उपक्रम घेण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment