Wednesday, November 10, 2021

बीज प्रक्रीयेसाठी जैविक जिवाणू खतांचा शेतकऱ्यांनी वापर करावा

 

बीज  प्रक्रीयेसाठी जैविक जिवाणू खतांचा शेतकऱ्यांनी वापर करावा

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जैविक जिवाणू संघ रायझोबीयम हरभरा ॲझ्याटोबॅक्टर रब्बी ज्वारी, गहु, मक्का, करडई आदी जैविक जिवाणू खते जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा धनेगाव नांदेड येथे रोखीने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी बिज प्रक्रीयेसाठी जिवाणू संवर्धन खताचा वापर करावा, असे आवाहन जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा धनेगावचे तंत्र अधिकारी एस. एस. स्वामी  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

जैविक जिवाणु खते सेंद्रीय  सजीव असून त्यामध्ये कोणताही अपायकारक टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नाही. हवेतील नत्र, स्पुरद, पलाश शोषून  साठवून नंतर पिकाला उपलब्ध करुन देणाऱ्या जिवाणुंची प्रयोग शाळेत वाढ करुन त्यापासुन तयार केलेल्या खताला जैविक जिवाणु खते म्हणतात. यामध्ये एक दल  तृण धान्य उदा. रब्बी ज्वारी, करडई, गहू, उस या रब्बी हंगामातील पिकास उपयोगी असलेले जिवाणू खत तसेच शेंग वर्गीय  व्दीदल पीकांसाठी उपयोगी असलेले रायझोबीयम हे हरभरा पिकासाठी वापरता येते. ॲझ्याटोबॅक्टर  रायझोबीयम या दोन खतापासून वातावणातील नत्र स्थिर करून पिकाना उपलब्ध होते. रासायनिक खतांच्या मात्रा कमी होवून खर्च कमी होवू शकतो. सर्व पिकांना उपयुक्त  आवश्यक असलेले स्फुरद  पलाश हे पीएसबी  केएमबी या जिवाणुव्दारे पिकाना उपलब्ध होते.

बिज प्रक्रीयासाठी 10 किलो बियाणे स्वच्छ फरशीवर प्लॉस्टीक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरुन त्यावर 100 मिली जैविक जिवाणू खतांचे मिश्रण असलेले द्रावण शिंपडुन हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रीया केलेले बियाणे सावलीत वाळवावे. वाळवलेले बियाणे त्वरीत पेरावेत.

जैविक जिवाणु खत वापरण्यापुर्वी जर बियाण्यांस  किटकनाशके बुरशीनाशके, जंतूनाशके  इ. लावलेले असतील तर जिवाणू संवर्धन नेहमीपेक्षा ज्यास्त प्रमाणात दिडपट लावणे चांगले राहील. कोणत्याही रासायनीक खतांबरोबर जिवाणू संवर्धन मिसळु नये. प्रत्येक पिकासाठी वेगवगळे जिवाणू संवर्धन असते. जिवाणू खते वापरल्यास पिक उत्पादनात 7 ते 10 टक्के वाढ आढळुन आली आहे. तसेच योग्य वापराने जमिनीची सुपीकता  उत्पादकता वाढते. जिवाणू खतांचा जमीनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तसेच नंतरच्या पीकात त्याचा फायदा होतो. जिवाणू खते वापरण्यास अत्यंत सोपे  कमी  खर्चाचे आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...