Friday, October 15, 2021

 आसना नदीवरील नवीन पुलावरुन एकमार्गी वाहतूक सुरू 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- नांदेड शहरातून भोकर फाटा-अर्धापूरकडे जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी यासह सर्व प्रकारच्या वाहनधारकांसाठी आसना नदीवरील जुना पूल पाडून नवीन बांधलेल्या पुलावरुन (छोटा पूल) एक मार्गी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबतची अधिसूचना निर्गमीत केली आहे. 

अर्धापूरकडून नांदेड शहराकडे येण्यासाठी दुचाकी, चारचाकी यासह सर्व प्रकारच्या वाहनधारकांसाठी आसना नदीवरील सध्या अस्तित्वात असलेला उंच पुलावरून एक मार्गी वाहतूक सुरु राहील. ही अधिसूचना 15 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत अंमलात राहणार आहे.    

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...