निवडणूक कामासाठी नियुक्त पथक प्रमुखांना
विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक
नांदेड (जिमाका) दि. 7
:-देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974
चा 2) कलम 21 अन्वये देगलूर विधानसभा मतदारसंघात निवडणूकीच्या कामासाठी नियुक्त
केलेल्या फिरते पथक 12 व स्थायी निगरानी पथक 22 यांच्या प्रमुखांना देगलूर
विधानसभा कार्यक्षेत्रात 5 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी
म्हणून नेमणूक केली आहे. या प्रकारे नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी
यांना संहितचे कलम 129, 133, 143 व 144
खाली अधिकार प्रदान केले आहे.
000000
No comments:
Post a Comment