Monday, October 25, 2021

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहणार

 

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहणार

नांदेड, (जिमाका) 25 : 90 देगलूर बिलेांली विधानसभेची पोटनिवडणूक दिनांक 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाला 30 ऑक्टोबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे.तसेच मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 प्रमाणे देगलूर विधानसभा क्षेत्रात भरणारे सर्व आठवडी बाजार 30 ऑक्टोबर रोजी बंद राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

देगलूर या गावातील भरणारे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सुरू राहतील.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...