आंतराष्ट्रीय साक्षरता दिनी पढना लिखना कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 27 :- शिक्षणाधिकारी नांदेड यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून 8 सप्टेंबर रोजी निरक्षरांसाठी पढना लिखना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या साक्षरता मोहिमेची शासन स्तरावर टप्याने
सुरुवात झाली आहे.त्यानुसार 8 सप्टेंबर 2009 पासून निरंतर शिक्षण योजनेर्तंगत
साक्षर भारत ही योजना राबविण्यात आली आहे.साक्षरतेचे प्रमाण वाढविणे हे उदिष्टे
ठेवून पढना लिखना अभियान योजना राबविण्यात येत आहे. सदर अभियानामध्ये काम
करण्याऱ्यांनी नजीकच्या शाळेत जाऊन नोंदणी करावी असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत
दिग्रसकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment