Saturday, August 28, 2021

 

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे आयोजन  

नांदेड (जिमाका) दि. 28 :- इयत्ता दहावी व बारावी मुख्य परीक्षा सन 2021 मध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोंबर 2021 मध्ये शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणार आहे. ही लेखी परीक्षा इयत्ता दहावी बुधवार 22 सप्टेंबर ते शुक्रवार 8 ऑक्टोंबर तर इयत्ता 12 वी सर्वसाधारण व द्विलक्षी विषय (जुना व पुनर्रचित अभ्यासक्रम) गुरुवार 16 सप्टेंबर ते सोमवार 11 ऑक्टोंबर तसेच इयत्ता बारावी व्यवसाय अभ्यासक्रम (जुना व पुनर्रचित अभ्यासक्रम) गुरुवार 16 सप्टेंबर ते शुक्रवार 8 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत आयोजित केली आहे. 

इयत्ता दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा मंगळवार 21 सप्टेंबर ते सोमवार 4 ऑक्टोंबर व बारावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार 15 सप्टेंबर ते सोमवार 4 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे. संकेतस्थळावरील वेळापत्रक फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा, महाविद्यालयाकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने, खाजगी यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरले जाणार नाही, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...