Wednesday, August 18, 2021

 

ब्रेक द चेनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना

मॉलमध्ये प्रवेश करतांना मुलांना वयाचा दाखवावा लागेल पुरावा   

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या आदेशातील मुद्दा क्र. 4 हा 4 अ म्हणून दर्शविण्यात आला आहे आणि 4 ब नुसार नि‍म्नलिखित सुधारणा अंतर्भुत करण्यात येत असल्याचे निर्देशीत केले आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 13 ऑगस्टच्या‍ आदेशातील मुद्दा क्र. 3 हा मुद्दा क्र. 3 अ म्हणून दर्शविला आहे. आणि 3 ब नुसार संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे सुधारणा 17 ऑगस्ट पासून शासनाच्या पुढील आदेशापर्यंत अंर्तभूत केल्या आहेत. तसेच आपत्ती निवारण कायदा 2005 नुसार राज्य व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष व सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशाचे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात काटेकोरपणे पालन करण्यासाठी आदेश निर्गमीत केले आहेत. 

3) शॉपिंग मॉल्स - अ) जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वाजे पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. परंतू शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल. तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहिल. ब) वय वर्षे 18 खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू न झाल्याने वय वर्षे 18 खालील वयोगटातील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. असे आदेश 17 ऑगस्ट रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...