“सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्याच्या सूचना
नांदेड (जिमाका) दि. 19 :- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा दरवर्षी “सद्भावना दिवस” म्हणून साजरा केला जातो. याअनुषंगाने “सामाजिक ऐक्य पंधरवडा” हा 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. विविध धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृद्धींगत करुन हिंसाचार टाळण्यासाठी हा पंधरवडा साजरा केला जातो. त्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
“सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्याचे
जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी अल्पसंख्यांक
विकास विभागाच्या 9 ऑगस्ट 2021 रोजी निर्गमीत केलेल्या शासन परिपत्रकातील
सूचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. कार्यक्रम साजरा करुन कार्यवाहीचा अहवाल
शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
00000
No comments:
Post a Comment