महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास स्पर्धेची
नोंदणी
15 ऑगस्ट पर्यत राहणार
सुरु
युवक-युवतींना स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्यातील युवक आणि युवतींना त्यांचे कौशल्य दाखविणे, एक उत्तम मंच उपलब्ध करुन देण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास स्पर्धा-2021’ चे आयोजन
करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि
देशपातळीवर करुन निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात
येतील. जिल्हा स्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन 17 तथा 18 ऑगस्ट 2021 या कालावधीत
संबंधित जिल्हयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयाच्या ठिकाणी
आयोजन करण्यात येईल.
जिल्हास्तरावर निवड झालेल्या उमेदवारांसाठी विभागीय स्तरावरील स्पर्धा 23 व 24 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित
करण्यात येणार आहे.
पुढे नामांकन झालेल्या उमेदवारांची राज्यस्तरावरील स्पर्धा 3, 4 व 5 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित
करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे या उद्देशाने 15 ऑगस्ट पर्यत नोंदणीसाठी गुगल लिंक https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9-eIBlPWfEYny_XK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform सुरू केली
आहे. या गुगल लिंकचा वापर करुन आपली नाव नोंदणी या स्पर्धेसाठी करता येईल. याबाबत काही
अडचणी / शंका असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी
क्र.
02462-251674 या संपर्क क्रमांकावर संपर्क
साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी
या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, नांदेडचे सहायक
आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार
यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment