Friday, July 23, 2021

 

कृषि यांत्रिकीकरण, सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत

महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- कृषि यांत्रिकीकरण तसेच सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत विविध योजनेतून महाडीबीटी पोर्टलवर नांदेड जिल्ह्यात 9 हजार 726 लाभार्थ्यांची निवड झाली आहे. या लाभार्थ्यांना लघुसंदेश पाठवण्यात आलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 4 हजार 291 लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली असून उर्वरित लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाहीत. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी यांत्रिकीकरण घटकासाठी  आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

अपलोड कराव्याच्या कागदपत्रात सातबारा उतारा, आठ-अ उतारा, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, तपासणी अहवाल, अ.जाती / अ.जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जातप्रमाणपत्र आदी कागदपत्रे तसेच सुक्ष्म सिंचन घटकासाठी आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा, आठ-अ उतारा, सिंचनाची स्रोत नोंद, अ.जाती / अ. जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अपलोड करावीत. 

ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत त्यांना कागदपत्रे तपासून पूर्व संमती देण्यात आली आहे. सुक्ष्म सिंचन या घटकांतर्गत ज्या लाभार्थ्यांना पूर्व समंती मिळूनही सुक्ष्म संच कार्यन्वित केले नाहीत अशा शेतकऱ्यांनी सुक्ष्म संच प्रक्षेत्रावर कार्यान्वित करुन देयके अपलोड करावीत. विहीत मुदतीत संच कार्यान्वीत करुन देयके अपलोड न केल्यास दिलेली पूर्व संमती रद्द करण्यात येणार आहे. 

मुदत देऊन विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यास असे अर्ज महाडीबीटी पोर्टल मधून अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे परंतु त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केली नाहीत अशा सर्वांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत. सद्यस्थितीत विभागाने Maha DBT Farmer या नावाचे मोबाईल ॲप तयार केले असून याद्वारे कागदपत्रे अपलोड करणे सुलभ झाले आहे. हे ॲप GooglePlay Store  वर उपलब्ध आहे. याविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

******

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...