जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी
रोजगार मार्गदर्शनपर वेबिनारचे शुक्रवारी आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- लॉकडाऊन नंतर बेरोजगार उमेदवारांना / युवक-युवतींना रोजगाराकडे कसे जाता येईल याबाबत मार्गदर्शन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शुक्रवार 25 जून रोजी दुपारी 3 वाजता वेबीनारचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवार / युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
या वेबिनारच्या माहितीसाठी (02462) 251674 या क्रमांकावर सपर्क करावा. वेबिनार जॉइन करण्यासाठी या https://meet.google.com/ziu-fbax-rvw गुगल मीट लिंकचा उपयोग
करावा. वेबीनारसाठी आपले रजिस्ट्रेशन/नोंदणी करण्यासाठी या https://forms.gle/CCUhiFTWEFqNYuSj8 लिंकवर ऑनलाइन
फॉर्म भरावेत. या वेबीनारमध्ये प्रताप श्रीनिवासन क्लस्टर हेड, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र औरंगाबाद, विजय जवंजाळ,
सेंटर हेड, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र औरंगाबाद
आणि विजय पुरोहित, सेंटर हेड, प्रधानमंत्री
कौशल्य केंद्र नांदेड हे मार्गदर्शन करणार आहे असे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले
आहे.
00000
No comments:
Post a Comment