दहावी परीक्षेच्या मूल्यमापन
कार्यपद्धतीबाबत मंडळाचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 10 :- इयत्ता दहावी परीक्षेची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना, मूल्यमापनाबाबतचे विषयनिहाय नमुने व वेळापत्रक, इत्यादी परिपत्रक व परिशिष्टेची सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. शासन निर्णय व परिपत्रकानुसार इयत्ता 10 वीच्या मूल्यमापन कार्यपद्धती संदर्भात प्रशिक्षणाच्या व्हिडिओ मंडळाचे युट्युब चॅनेल http://mh-ssc.ac.in/faq या लिंकवर उपलब्ध करुन दिले आहे. सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांनी त्यानुसार प्रशिक्षण घेऊन पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी इयत्ता दहावी परीक्षा कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णय 28 मे 2021 नुसार इयत्ता दहावी साठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर केली आहे.
या शासन निर्णयातील
तरतुदीनुसार मंडळामार्फत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना व
वेळापत्रक मंडळामार्फत निश्चित करण्यात आले आहे. त्याची कार्यपद्धती तयार करण्यात
आली आहे. त्यामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात मंडळामार्फत आयोजित करण्यात
आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमितत,
पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट
होणारे परिक्षार्थी ततसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांचे
मूल्यमापनाबाबतचा तपशील व विषयनिहाय परिशिष्टे याबाबतचे परिपत्रक मंडळाच्या
संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे, अशी माहिती सचिव, राज्यमंडळ पुणे यांनी दिली
आहे.
00000
No comments:
Post a Comment