Friday, March 19, 2021

 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी

वर्षा ठाकूर यांना कोरोनाची बाधा

सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध बैठका, अर्थसंकल्प व इतर विषयांबाबत मागील काही दिवसात झालेल्या बैठका व सभा लक्षात घेता संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

माझी प्रकृती ठिक असून मी अत्यावश्यक असलेले सर्व कामकाज ई-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करीत आहे. मी गृहविलगीकरणाचा पर्याय निवडला असून डॉक्टरांनी दिलेल्या सर्व निर्देशाचे पालन करीत असल्याचे वर्षा ठाकूर यांनी स्पष्ट केले. कार्यालयीन कामकाजासंदर्भात कार्यालयात व परिसरात जे कोणी माझ्या कार्यालयात उपस्थित होते त्यांनी काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता असून आवश्यकता जर नसेल तर जनतेने बाहेर जाणे टाळावे, असेही वर्षा ठाकूर यांनी सांगितले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...