Saturday, March 20, 2021

 

नांदेड जिल्ह्यात आज 947 व्यक्ती कोरोना बाधित

सात जणांचा मृत्यू

जनतेने सुरक्षितता पाळण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 896 अहवालापैकी 947 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 509 तर अँटिजेन तपासणीद्वारे 438 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 30 हजार 789 एवढी झाली आहे.

 

शुक्रवार 19 मार्च 2021 गाडीपुरा नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, शनिवार, 20 मार्च, 2021 गोनार ता. कंधार येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, वजिराबाद नांदेड येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा , मालेगाव रोड नांदेड येथील 76 वर्षाची एक महिला, मंगनपुरा नांदेड येथील 77 वर्षाची एक महिला, संचित नगर नांदेड येथील 75 वर्षाची एक महिला  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे , तर आझाद कॉलनी देगलूर येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा देगलूर कोविड रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 639 एवढी झाली आहे.

 

आजच्या 3 हजार 896 अहवालापैकी 2 हजार 723 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 30 हजार 789 एवढी झाली असून यातील 25 हजार 154 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 4 हजार 770 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 47 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 19, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 259, माहूर तालुक्यअतंर्गत 7, हदगाव कोविड रुग्णालय 7, धर्माबाद कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय 6, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 11, खाजगी रुग्णालय 28 असे एकूण 340 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.69 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 365, अर्धापूर तालुक्यात 11, किनवट 2, धर्माबाद 27, लोहा 26, उमरी 5, नायगाव 5, हिंगोली 12, नांदेड ग्रामीण 19, भोकर 2, हिमायतनगर 7, हदगाव 6, मुखेड 20 , कंधार 7 एकूण 509 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 214, अर्धापूर तालुक्यात 11, भोकर 9, देगलूर 9, हदगाव 12, किनवट 21, माहूर 20, नायगाव 5, उमरी 10,परभणी 2 ,नांदेड ग्रामीण 31, बिलोली 15, कंधार 3, धर्माबाद 5, हिमायतनगर 1, लोहा 55, मुदखेड 1, मुखेड 12, औरंगाबाद 1, हिंगोली 1 असे एकूण 438 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 4 हजार 770 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 191, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 85, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 107, किनवट कोविड रुग्णालयात 34, मुखेड कोविड रुग्णालय 74, देगलूर कोविड रुग्णालय 14, हदगाव कोविड रुग्णालय 26, लोहा कोविड रुग्णालय 119, कंधार कोविड केअर सेंटर 12, महसूल कोविड केअर सेंटर 94, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 772, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 864, खाजगी रुग्णालय 378 आहेत.

 

शनिवार 20 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 67 हजार 564

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 31 हजार 704

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 30 हजार 789

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 25 हजार 154

एकुण मृत्यू संख्या-639

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.69 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-27

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-199

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-327

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 770

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-47.

00000

 

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...