नांदेड जिल्ह्यात 219 व्यक्ती कोरोना बाधित तर
1 हजार 360 अहवालापैकी 1 हजार 132 निगेटिव्ह
नांदेड (जिमाका) दि. 10 :- बुधवार 10 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या
कोरोना अहवालानुसार 219 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर
तपासणीद्वारे 56 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 163 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 80 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे
त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या 1 हजार 360 अहवालापैकी 1 हजार 132 अहवाल
निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 25 हजार 190 एवढी झाली असून यातील 23 हजार 121
बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 247 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 32 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे
जिल्ह्यातील 607 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय
कोविड हॉस्पिटल नांदेड 23, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 41, किनवट कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण
80 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित
रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 91.78 टक्के
आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे
नांदेड मनपा क्षेत्र 30, किनवट तालुक्यात 6, माहूर 2, यवतमाळ 1, नांदेड
ग्रामीण 6, लोहा 1, मुदखेड 10 असे एकूण 56 बाधित आढळले.
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड
मनपा क्षेत्र 127, अर्धापूर तालुक्यात 5, देगलूर 1, हदगाव 6, लोहा 4, मुखेड 5,
परभणी 1, नांदेड ग्रामीण 2, भोकर 2, धर्माबाद 3, किनवट 4, माहूर 1, यवतमाळ 1,
नागपूर 1 असे एकूण 163 बाधित आढळले.
जिल्ह्यात 1 हजार 247 बाधितांवर औषधोपचार सुरु
आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 53, जिल्हा
रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 80, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी
इमारत) 57, किनवट
कोविड रुग्णालयात 31, मुखेड
कोविड रुग्णालय 21, हदगाव कोविड रुग्णालय 9, महसूल
कोविड केअर सेंटर 68, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड
मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 589, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 225, खाजगी रुग्णालय 109 आहेत.
बुधवार 10 मार्च 2021 रोजी 5 वा.
सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 135, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16
एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची
संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 43
हजार 902
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 14
हजार 185
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 25 हजार 190
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 121
एकुण मृत्यू संख्या-607
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 91.78 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-07
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-270
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार
247
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-32.
0000
No comments:
Post a Comment