मालेगावच्या ग्रामीण रूग्णालयाला शासनाची मंजुरी
पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा पाठपुरावा
नांदेड (जिमाका) दि. 4 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याने अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
या ग्रामीण रुग्णालयाची क्षमता 30 खाटांची असणार आहे. याठिकाणी चार
वैद्यकीय अधिकारी व सुमारे 25 आरोग्य कर्मचारी तैनात असतील. विविध आजारांचे तज्ज्ञ
वैद्यकीय अधिकारी या ग्रामीण रुग्णालयात कार्यरत राहणार असल्याने परिसरातील
नागरिकांना दरवेळी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. मालेगाव आणि
लगतच्या परिसरातील नागरिकांची ग्रामीण रुग्णालयाची मागणी मागील अनेक वर्षांपासून
राज्य सरकारकडे प्रलंबित होती. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा
करून नागरिकांना मोठा दिलासा मिळून दिला. मालेगाव-अर्धापूर परिसरातील सार्वजनिक
आरोग्य सेवेला यामुळे बळकटी मिळाली आहे.
0000
No comments:
Post a Comment